मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मी कोण?

खरंच मी कोण आहे? असा प्रश्न पडतो, तेव्हा माझ्या बद्दलच्या या प्रतिक्रिया लक्षात घेणे गरजेचे होऊन बसते.
" तू ना खूप भोळा आहेस. अरे तुझ्या स्वभावाचा सगळे फायदा घेतात हे तुला कळत नाही.' – इति आई.
'' लॉलीपॉप आणून देते तुला एक. रुद्रापेक्षाही लहान आहेस तू.'' – अर्थातच बायको.
'' बघ तू काय तो योग्य निर्णय घे. मला तुझ्या क्षेत्रातलं काहीच कळत नाही." – वडील
'' पक्का व्हीम्जीकल आहेस, येथे काम करताना तुझ्या सगळ्या व्हीम्स बाजूला ठेव.'' – एक संपादक
'' रोज देवाजवळ दिवा लाऊन एक माळ जप करावा. '' – आजोबा ( आईचे वडील )
'' जोश्या तू तर आपला मित्रहे'' – मामा
'' हां ! काही पण सांगतो का '' – बहिण.
''... पण काही म्हण तू एका जागी टिकू शकत नाहीस. आपले नाव प्रयोग नाही, तर रिसल्ट असायला हवे'' – एक साहित्यिक संपादक
'' माझा बच्चूये गं तो'' – मावशी
'' ए हिऱ्या...'' – आजी (वडिलांची आई )
'' पंक्या तू खूप स्वार्थी आहेस'' – एक दिवंगत मित्र
'' देखो, मै कौन …
अलीकडील पोस्ट

बुट चोरीच्या एफआयआरची खरी गोष्ट

नवा बुट चोरीला गेल्याची घटना माझ्या मनाला खूप लागली. त्यामुळे मी थेट पोलिस स्टेशन गाठून बुट चोराला पकडण्याबद्दल तक्रार दिली. त्यांनी तक्रार नोदंविली खरी, पण नंतर मला अनेक भन्नाट गोष्टींचा सामना करावा लागला...
गोष्ट अगदी खरी आहे. मागच्या दिवाळीत (२०१२) घडलेली. तर झालं असं शुक्रवार ९ नोव्हेंबर २०१२ ची रात्र होती. आमच्या दोन वर्षांच्या मुलीने रात्री अकराच्या सुमारास रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. हिचं काहीतरी बिघडलं असणार म्हणून तातडीने आम्ही तिला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेलं. काळजीसारखं नसल्याचं डॉक्टर म्हणाले. त्यामुळे काळजीमुक्त होऊन परतलो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. डोळ्यावर बर्‍यापैकी झोप होती. गाडी पार्किंगचे सोपस्कार पटकन उरकून पायातला बुट तसाच बाहेरच्या गॅलरीत काढून मी घरात आलो.

डेअरी अभियानाचा ‘राजहंस’

गोष्टी बेरडवाडीच्या :  महाराष्ट्रातीलच एका कोपर्‍यात डोंगरपायथ्याशी वसलेलं एक गाव म्हणजे बेरडवाडी. येथील लोक म्हणजे एक से बढकर एक नमुने असल्याने या गावचा पत्ता सांगून आम्ही तुमची पंचाईत करणार नाही; पण बेरडवाडीतल्या प्रत्येक घडामोडी  नियमित तुमच्यापर्यंत पोचवण्याचे काम मात्र आम्ही करणार आहोत.  - - गाववाला


दुपार उलटत चालली, तशी अण्णा पाटलांची घालमेल वाढायला लागली. एरवी जेवणानंतर ओसरीवरच्या झोपाळ्यावर डुलत डुलत मस्तपैकी ताणून द्यायची ही अण्णाची सवय. त्यात आज तर पशुखात्याचा तालुक्याचा साहेब आल्यामुळे मस्तपैकी तांबड्या रश्शाचा बेत होता. साहेबांबरोबरच अण्णांनीही जेवणावर उभा आडवा हात मारला होता. अण्णाची पद्धत अशी होती की, असं खारं जेवण झालं की थेट माडीवरच्या खोलीत जायचं अन् दिवाणावर मस्तपैकी ताणून द्यायची; पण जेवणानंतर पशुअधिकार्‍यानं जे सांगितलं, त्यामुळं अण्णाचा चेहरा जास्तच चिंताग्रस्त झाला. साहेब तर निघून गेला; पण अण्णा पाटलाच्या जीवाला घोर लागला.

मी बाप

आज बर्‍याच दिवसांनी लिहितोय. दिवस कसले वर्षच झाले म्हणा ना. गाववाल्याचा ब्लॊग या नावाने सुरवात करण्याचे कारण म्हणजे माझे बालपण आणि संपूर्ण शालेय जीवन खेड्यांमध्ये गेलेले. काही खेडी अशी की दवाखानेही तिथे नव्हते. तर काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न ! शहर आणि शहरी जीवन माझ्यासाठी स्वप्न होते. आज ग्रामीण भाग सोडून तब्बल २० वर्षे झाली असतील. पण मनातुन आणि कधी कधी वागण्यातूनही गावाच्या आठवणी काही केल्या पुसत नाहीत. किंबहुना त्या माझ्या जगण्याचाच एक भाग बनल्या आहेत. त्यामुळेच ब्लॉगवर लिहिताना गावाचे संदर्भ येत गेले.

कॉलेज तरुणाईही गावठी दारूच्या विळख्यात

तपोवन परिसरात रस्त्यावरच असलेल्या एका घरात घसून एका 50 वर्षीय दारूड्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्या मुलीच्या वडीलांनी त्या इसमाला रस्त्यावरच चोप दिला तेव्हा इतरांना खरा प्रकार समजला....

सरकारी खात्यात काम करीत असलेल्या येथीलच एका इसमाला वाघाडी परिसरातील गावठी दारूचे व्यसन लागले आणि ऐन पंचेचाळीशीतच दारूमुळे त्याला कुटुंबाला उघड्यावर सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला.

अनेकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या अशा दुर्घटना केवळ पंचवटीतच नाही, शहरातील बऱ्याच भागात घडत असून त्याला कारणीभूत आहे वाघाडी परिसरात खुलेआम होत असलेली गावठी दारूची विक्री ! याठिकाणी उसाच्या गुऱ्हाळाप्रमाणे गावठी दारूचे अनेक अड्डे असून भल्या पहाटेपासूनच तेथे राजरोसपणे दारू विक्रीला सुरवात होते.

एक "राज'कीय खेळी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या सबुरीने निषेध नोंदवत आपल्या राजकीय मुरब्बीपणाचे (आणि मुत्सद्दीपणाचे) चांगलेच दर्शन घडविले. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या जाहीर सभेची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती; आणि तशी उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी सुरवातीपासूनच राज ठाकरेंनी अगदी पद्धतशीरपणे प्रयत्न केला. आजच्या माध्यमकाळात असा प्रयत्न यशस्वी झाला नसला तरच नवल. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी ज्या संख्येने लोक उपस्थित होते, त्यावरून याची प्रचिती यावी.

दभिंशी मुक्त संवाद

मागच्याच आठवड्याची गोष्ट. संध्याकाळच्या वेळेस घराजवळ अचानकच दभिंची भेट झाली. ओघाओघाने गप्पा मारणेही आलेच. बऱ्याच विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्या. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने गेल्या दीड महिन्यात त्यांनी बऱ्याच गावांना, संस्थांना भेटी दिल्या. त्याविषयी बोलणे झाले. बोलण्याच्या ओघात त्यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्राचा, "अपार्थिवाचा यात्री'चा उल्लेख आला. दभिंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचे आत्मचरित्र म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वाचकासाठी एक जिज्ञासेचाच विषय. त्यात हे आत्मचरित्र विरळा.